शिवरायांचा पुतळा उभारताना चुकीची वेल्डिंग, कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला, चौकशी समितीचा ठपका

On
शिवरायांचा पुतळा उभारताना चुकीची वेल्डिंग, कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला, चौकशी समितीचा ठपका

Malvan Shivaji Maharaj statue collapses : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला, असा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या अहवालामुळे छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती. तसेच या समितीलाी 30 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने आता आपला 16 पानी अहवाल सरकार दरबारी सादर केला आहे. त्यात हा पुतळा कमकुवत फ्रेम आणि पुतळ्यात गंज चढल्यामुळे कोसळल्याचा दावा केला आहे.

समितीत यांचा समावेश 

भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.

चौकशी अहवालात काय म्हटले

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. पुतळ्यातील गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंग कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे, या अहवालात म्हटले आहे. पुतळा उभारलेले फ्रेमवर्क तितके मजबूत नव्हते. तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाली नसल्याने पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.

अनावरणानंतर 8 महिन्यांतच कोसळला होता पुतळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा कोसळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींचीदेखील माफी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा बांधकाम पाहणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे अटक केली होती.

राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपतींचा पुतळा उभारणार

सिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी साधारण 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे.  

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार