जिल्हा परिषदेच्या शाळेत जबरी चोरी; 13 संगणकासह 2.20 लाखांचा मुद्देमाल लंपास

चाकूर येथील जि. प. शाळेतील घक्कादायक प्रकार उघडकीस

On
जिल्हा परिषदेच्या शाळेत जबरी चोरी; 13 संगणकासह 2.20 लाखांचा मुद्देमाल लंपास

चाकूर / प्रतिनिधी  : येथील जिल्हा परिषद शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणकांसह संचाची चोरी केल्याची घटना २५ व २६ तारखेच्या मध्यरात्री घडली. गुरुवारी (दि.२६) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

शाळेचे मुख्याध्यापक -शिक्षक नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत आले असता त्यांना शाळेचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन बघितले असता त्यांना सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी शाळेतील संगणक संचासह वस्तू चोरून नेल्याचे दिसून आले.

WhatsApp Image 2024-09-26 at 10.25.43 PM

यावर मुख्याध्यापक बालाजी बिराजदार यांनी तात्काळ चाकूर पोलीस ठाण्यास माहिती दिली. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल गेला आहे, पुढील तपास चाकूर पोलीस करत आहे. या शाळेच्या परिसरात सुरक्षारक्षक ही नसल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार