प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसाठी डॉक्टर बनले देवदूत!

अनेक जटील शस्त्रक्रिया होऊन देखील महिलेचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश...!

On
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसाठी डॉक्टर बनले देवदूत!

लातूर / प्रतिनिधी :  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या शरीरात अनेक समस्या उदभवल्या होत्या.पण डॉक्टरांनी घेतलेल्या अथक परिश्रम आणि त्या महिलेच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याने अनेक शस्त्रक्रिया होऊन  देखील पन्नास दिवसांच्या नंतर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन घरी परत गेली.त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या आईला पुनर्जन्म मिळाला. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दी : ३० जुलै २०२४ रोजी  एल. आई. सी कॉलोनी येथील विजयमाला ज्योतिराम चौधरी ही ३० वर्षीय महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसूती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीला व मूत्राशयाला प्लासेंटा चिकटून बसल्याने व अती रक्तस्त्राव व रक्त दाब कमी झाल्याने गर्भाशयाची पिशवी काढावी लागली.

WhatsApp Image 2024-09-20 at 5.46.03 PM

मूत्राशयाला प्लासेंटाने जकडल्यामुळे मूत्राशयाला छिद्र पडले व त्याच क्षणी शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची धुरा सांभाळली. पण काही दिवसांनंतर असे आढळून आले की, मूत्राशय येथे घेतलेले टाके कमजोर पडले, व रुग्णाला पुन्हा, २१ ऑगस्ट २०२४ रोजी शस्त्रक्रिया करून मुत्राशयावर पुन्हा टाके घेण्यात आले. रुग्ण महिलेचे  पूर्वीपासूनच हृदय कमजोर असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात हलवून  व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. खूप दिवस व्हेंटिलेटरवर असल्यामुळे  रुग्णाच्या  फुफुस्सावर  देखील परिणाम झाला होता.  

WhatsApp Image 2024-09-20 at 5.46.04 PM

त्यासाठी २४ ऑगस्ट २०२४ रोजी तिच्या श्वासन नलिकेत छिद्र बनवून तात्पुरता श्वास घेण्याची व्यवस्था करण्यात आली. रुग्णावर खूपच बारकाईने लक्ष देऊन काही दिवसांनी तिला सामान्य रुग्ण कक्षात हलविण्यात आले, पण श्वासनलिकेतील नळी मात्र तशीच ठेवण्यात आली. मुळातच प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे रुग्णाचे टाके खराब झाले व त्यासाठी ०७ सप्टेंबर २०२४ रोजी  पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करून टाके घालण्यात आले. या सर्व प्रसंगांना झुंज देत, सदर रुग्णाची कृत्रिम श्वास नलिका ही १५ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्णपणे काढण्यात आली. रुग्ण आत्ता पूर्णपणे सामान्य पद्धतीने श्वास घेत आहे व तिचे टाके व्यवस्थित निघाले. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात.त्याचा अनुभव रुग्ण महिला,तिचे कुटुंबीय,डॉकटर,हॉस्पिटल मधील कर्मचारी यांनी घेतला असेच म्हणावे लागेल.महिला रुग्णाला पूर्ण बरे वाटल्याने १९ सप्टेंबर रोजी   तब्बल ५० दिवसांच्या रुग्णाची झुंज व सर्व डॉक्टर कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आले.

WhatsApp Image 2024-09-20 at 5.46.06 PM

या सर्व शस्त्रक्रिया, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या. या शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय पौळ पाटील, विभागप्रमुख डॉ. मेघराज चावडा, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्यात विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. धीरजकुमार हेडा(मूत्रपिंड विकार तज्ञ), डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. प्रमोद लोकरे यांचा मोलाचा वाटा होता. वरिष्ठ निवासी डॉ. मानवेंद्र सिंह व डॉ. सुमित चव्हाण यांनी देखील  शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात मेहनत घेतली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे तत्कालीन प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. वर्षा देशमुख, प्राध्यापक डॉ. बी. बी यादव, सहयोगी प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव, सहाय्यक प्राध्यापक डॉ. विष्णू तरसे यांचा देखील मोलाचा वाटा होता.  सर्व शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्यात बधिरिकरण शास्त्र विभागाने  विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र चौहान यांनी विशेष श्रम घेतले, 

या डॉक्टरांचे विशेष मार्गदर्शन

रुग्णाला कृत्रिम श्वासनलिका टकण्यापासून, ते, ती योग्यपणे काढे पर्यंत कान, नाक, घसा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद कंदाकुरे, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या  डॉ. नीलिमा देशपांडे, डॉ. रयभोगे व डॉ. हृषिकेश हरदास यांचे देखील सहकार्य महत्त्वाचे होते. श्वसन चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. वाघमारे व सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजीत यादव व हृदयरोग तज्ञ डॉ. परमेश्वर यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होते.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञता हिच आमच्या कामाची पावती 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची काळजी घेतली जाते. अनेक अ‌वघड व गुंतागुतींच्या  शस्त्रक्रियाही  यशस्वीपणे पार पाडल्या जातात.  रुग्णालयातील सोयी -सुविधांचा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ लातूरसह आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना होतो. शर्थीच्या प्रयत्नांने, या क्षेत्रातील ज्ञान व अनुभवामुळे डॉक्टरांना यश आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञता हिच आमच्या कामाची पावती आहे अशी प्रतिक्रिया विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते यांनी व्यक्त करून डॉकटर आणि कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार