इ. सन 712 पासून आजपर्यंत "एकच बदलले नाहीं, ते म्हणजे हिंदू जागाच झाला नाहीं" - हभप. शिरीष महाराज मोरे 

छ. शिवाजी महाराजांच्या सैन्यात केवळ 12 मुस्लिम होते ; बाकी चर्चा म्हणजे केवळ हिंदू समाजाची दिशाभूल !

On
इ. सन 712 पासून आजपर्यंत

11th descendant of Jagadguru Tukaram Maharaj लातूर / प्रतिनिधी : आजही देशाचे इस्लामीकरण करण्यासाठी अनेक कारवाया सुरू आहेत. यामुळे हिंदू धर्म संकटात सापडला आहे. याचे गांभीर्य ओळखून हिंदू समाजाने जागृत होऊन देशाची व धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, ह भ प श्री शिरीष महाराज मोरे यांनी केले.

लातूर गावभागात, रत्नाई मंगल कार्यालय, कुंभार चौक, रत्नापूर चौक, ह्या ठिकाणी रविवार दि 22 सप्टेंबर 2024 दुपारी 4 वाजता, लातूर गाव भाग धर्मजागरण समितीतर्फे  ठेवन्यात आला होता. छत्रपती शिवारायांच्या संकल्पनेतील हिंदवी स्वराज्य  ह्या विषयावर धार्मिक,आध्यत्मिक व वास्ताविक विवेचन जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, ह भ प श्री शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या व्याख्यानात सविस्तर विषद केले.

WhatsApp Image 2024-09-23 at 4.45.55 PM

यावेळी बोलतांना त्यांनी जुलमी मुघल राजवटीचे अनेक दाखले देऊन ही राजवट कीती जुलमी राजवट होती याचे विवेचन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, इसवीसन 712 ला मोहम्मद बिन कासिम चे आक्रमण पहिल्यांदा हिंदुस्तानावर झाले, त्यानंतरच्या घोरी, गजनी, खिलजी, बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान इत्यादी ह्या सर्व मुस्लिम आतंकवाद्यानी हिंदुस्थानामध्ये अत्यंत क्रूरपणे व निर्दयीपणे हिंदूंचा नरसंहार केला,  महिलांवर अत्याचार केले, लहान मुलांना हवेत फेकून भाल्यावर झेलले, मंदिरे तोडली, देवळात गाई कापल्या, देवाच्या मुर्त्यांची विटंबना केली.

अशी अनेक राक्षसी कृत्य ह्या मुस्लिम शासकांनी व त्यांच्या सरदारांनी संपूर्ण भारतात केली.राजा रामदेवराय, शिख सरदार बंटासिंग बहादुर तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची कशा पद्धतीने हाल हाल करून निर्दयी हत्या करण्यात आली हेही महाराजांनी यावेळी कथन केले. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये फक्त 12 मुस्लिम होते बाकीच्या चर्चा म्हणजे लोकांची दिशाभूल आहे हे त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनोज सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करत असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमांची व व्याख्यानांची आवश्यकता का आहे याचे विवेचन करताना भूतकाळात देशाची व धर्माची प्रचंड हानी झालेली आहे आणि वर्तमान काळातही धर्म व देश संपवण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये संतांची भूमिका महत्त्वाची आहे. संतांनी फक्त आपला धर्म सांगून पुरेसं होणार नाही तर आपल्या धर्माविरोधात चाललेले षडयंत्र, आपल्या धर्मासमोरील धोके लोकांना सांगून त्यांना जागृत केलं पाहिजे. त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मनोज सूर्यवंशी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनीयर कुलदीप शिंदे यांनी केले, तर आभार योगेश उन्हाळे यांनी मानले. याप्रसंगी महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणे यांचे ओंकार माने, सुशांत एकोरगे तसेच लातूर गावातील, तरुण मुलंमुली, वायोवृद स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  भीमा जाधव, दत्ता क्षीरसागर, मनोज बारसकर, नवनाथ पुस्कर, संतोष चोथवे, योगेश गवळी, संभाजी कांबळे, गणेश निकम, बापू कुंभार, शहाजी सूर्यवंशी, उमेश नागुरे, योगेश उन्हाळे, मुकेश गोरे तसेच गाव भागातील गणेश मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेतला.

देशाचे इस्लामीकरण करण्यासाठी आजही जिहादी कारवाया कार्यरत 

आजही देशाचे इस्लामीकरण करण्यासाठी फूड जिहाद, लव जिहाद, वफ बोर्डाच्या माध्यमातून लँड जिहाद, वोट जिहाद कशा पद्धतीने केलं जात आहे व त्याचे हिंदू धर्मावर व देशावर काय परिणाम होणार याबद्दलचे सविस्तर विवेचन महाराजांनी केले,  तसेच हिंदू समाजाने जागी होऊन देशाची व धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल महाराजांनी मार्गदर्शन केले. दुर्दैवाने, इसवीसन 712 पासून ते 2024 म्हणजे, आज पर्यंत एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे झोपलेला हिंदू जागा झाला नाही अशी खंत सुद्धा महाराजांनी व्यक्त केली.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार