मनपा ॲक्शन मोडवर..! अतिवृष्टीनंतर पालिकेची यंत्रणा गतिमान ; मनपा अधिकारी 'ऑनफील्ड'

अवघ्या कांही तासात परिस्थिती नियंत्रणात : शहरवासीयांनी मानले आयुक्तांचे आभार

On
मनपा ॲक्शन मोडवर..! अतिवृष्टीनंतर पालिकेची यंत्रणा गतिमान ; मनपा अधिकारी 'ऑनफील्ड'

Latur Heavy Rain, Municipal Action लातूर / प्रतिनिधी : मंगळवारी पहाटे व सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. यानंतर शहरातील सखल भागात पाणी साचले. कांही घरातही पाणी शिरले होते.यानंतर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होत उपाययोजना केल्या व परिस्थिती पूर्वपदावर आणली.

मंगळवारी पहाटे व सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत शहरात ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झाला. यामुळे इस्लामपुरा,कॉइल नगर,नांदगाव वेस,डी मार्ट परिसर,रिंग रोड,राजीव गांधी चौकातील सह्याद्री हॉस्पिटल,विराट हनुमान, सौभाग्य नगर,रामरहीम नगर,उस्मानपुरा,नाना नानी पार्क या भागात पाणी साठले.

WhatsApp Image 2024-09-25 at 7.38.29 PM

इस्लामपुरा येथील २०,उस्मानपुरा भागात १० आणि तुळशीधाम परिसरातील ८ ते १० घरात पावसाचे पाणी शिरले होते. याची माहिती मिळताच मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे मार्फत ३ अग्निशमन वाहने व २ इंजिन तसेच स्वच्छता विभागाचे ३ इंजिन व ६  जेसीबी मार्फत पाणी काढून देण्याची कार्यवाही करण्यात आली.

WhatsApp Image 2024-09-25 at 7.38.28 PM (1)

अनेक ठिकाणी जेसीबीद्वारे पाण्याला रस्ता करून देण्यात आला.काही ठिकाणी इंजिन वापरून घरातील पाणी नाल्यात सोडण्यात आले. मनपा  आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी रात्रभर 'ऑन फिल्ड' होते. आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सुचना केल्या.

WhatsApp Image 2024-09-25 at 7.38.28 PM

ज्या भागातून नागरिकांचा दूरध्वनी आला त्या भागात तात्काळ अधिकारी व कर्मचारी पाठविले जात होते.यामुळे साठलेल्या पाण्याचा लवकर निचरा करून परिस्थिती पूर्वपदावर आणणे शक्य झाले. आपत्तीच्या काळात नागरिकांना पालिकेस माहिती देता यावी यासाठी मनपात आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.आपत्तीच्या काळात नागरिकांनी ०२३८२-२५५५८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार