वजन कमी करण्यासाठी औषधे घेत आहात? होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम, वाचा सविस्तर...!

On
 वजन कमी करण्यासाठी औषधे घेत आहात? होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम, वाचा सविस्तर...!

Taking Medication To Lose Weight These Side Effects : आजकाल वजन कमी करण्याच्या काही औषधांची खूप चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी ही औषधे घेत असल्याचे बोलले जात आहे. या औषध कंपन्यांकडून असा दावा केला जात आहे की ही औषधे घेतल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

ब-याच जणांना कोणतीही मेहनत न करता लगेच वजन कमी करायचे असते. त्यामुळे या औषधांना रातोरात मागणी वाढली असून वजन कमी करण्यासाठी लोक या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पण या औषधांमुळे वजन कमी होते का आणि दीर्घकाळापर्यंत ही औषधे घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात का? हे जाणून घेऊया....!

ही औषधे कसे काम करतात?

खरं तक वजन कमी करण्याची औषधे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. यापैकी काही औषधे घेतल्याने, व्यक्तीला भूक कमी लागते आणि पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तो जास्त खाण्याची सवय सोडून देतो आणि कमी खातो. या फॉर्म्युल्याच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीचे वजन एका आठवड्यात कित्येक किलोने कमी होते.

याशिवाय काही औषधांमुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातील चरबी शोषून घेणे कठीण होते, म्हणजेच तुमचे शरीर अन्नातून चरबी शोषण्यास सक्षम नसते. यामुळे तुमचे वजनही कमी होते. काही औषधे शरीरातील हार्मोन्सप्रमाणे काम करतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Ladda

एक्सपर्ट्स काय सांगतात?

काही फिटनेस एक्सपर्ट्सच्या मते ही औषधे तात्काळ प्रभाव दाखवून तुमचे वजन कमी करतात, परंतु काही काळाने ती घेणे बंद केल्यास वजन आपोआप वाढते. अशा परिस्थितीत औषधांच्या मदतीने नैसर्गिकरित्या वजन कमी करणे अधिक फायदेशीर आहे. तसेच, जेव्हा तुम्हाला औषधे घेतल्याने भूक कमी लागते तेव्हा तुमच्या शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत असते ज्यामुळे तुम्हाला थकवा येणे, अशक्तपणा जाणवू शकतो. त्याच वेळी, चरबीचे शोषण रोखणारे औषध घेतल्याने, शरीरात चरबीची कमतरता सुरू होते पण शरीराला विशिष्ट प्रमाणात चरबीची आवश्यकता असते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत आहे. काही लोकांना व्यायाम आणि आहाराशिवाय वजन कमी करायचे असते आणि त्यासाठी औषधे घेणे सुरू केले जाते, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की ही औषधे काही काळ काम करू शकतात परंतु त्यांचे दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे यकृत आणि किडनी खराब होऊ शकतात.

New Project (15)

वजन कमी करण्याच्या औषधांचे दुष्परिणाम

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. 
  • शरीरातील साखर अचानक कमी होऊ शकते.
  • आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात कमजोरी आणि थकवा येऊ शकतो.
  • झपाट्याने वजन कमी केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचा वैद्यकीय इतिहास तपासून आणि काही महत्त्वाच्या चाचण्या घेतल्यानंतर हे औषध घ्या. तसेच, ही औषधे इतर औषधांच्या तुलनेत खूपच महाग आहेत, त्यामुळे ही औषधे नियमितपणे घेणे सोपे नाही आणि औषधे मध्येच बंद केल्याने तुम्ही पुन्हा जाड होऊ शकता.त्यामुळे अचानक वजन कमी करण्याऐवजी माफक प्रमाणात वजन कमी करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यासाठी सकस आहार आणि व्यायामाची मदत घेतली तर चांगले होईल. 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार