तिरुपती लाडूंवरील FSSAI च्या  अहवालाची प्रतीक्षा, आधीच्या तक्रारी आल्या का तपासण्याची शक्यता

On
तिरुपती लाडूंवरील FSSAI च्या  अहवालाची प्रतीक्षा, आधीच्या तक्रारी आल्या का तपासण्याची शक्यता

Tirupati Laddu Dispute Case : तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी असल्याच्या एका खासगी संस्थेच्या अहवालानंतर आता लाडूसंदर्भात एफएसएसआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) अहवालाची प्रतीक्षा आहे.  तर दुसरीकडे भेसळीच्या आरोपांवरील वादाच्या दरम्यान, या लाडूंसदर्भात याआधी काही तक्रारी होत्या का हे तपासावे लागेल असे सरकार म्हणाले तर ग्राहक व्यवहार विभागाने  काही कारवाई करणे आवश्यक आहे का? याची चाचपणही केली जात आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकताच दावा केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात लोकप्रिय लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण तापले आहे.

लाडूत चरबी प्रकरणी विशेष पथकाची घोषणा

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 22 सप्टेंबर रोजी तिरुपती लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. कारण हिंदू मंदिरे आणि त्यांच्या 'प्रसाद' च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी पावले उचलण्याच्या मागणी होत आहे. त्या धर्तीवर विशेष पथक तपास करणार आहे.

चरबी अन् माशांच्या तेलाचे घटक वापरल्याचा आरोप

तत्पुर्वी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल सापडल्याची खात्री प्रयोगशाळेच्या अहवालात झाली आहे. सीएम चंद्रबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटक वापरल्याचा आरोप केला होता.

काय आहे प्रयोगशाळेचा अहवाल

तिरुपती लाडूमध्ये गोमांस, डुकराची चरबी वापरली जाते, प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एनडीडीबी सीएएलएफ या खासगी प्रयोगशाळेने तयार केलेल्या तपासणी अहवालात असे समोर आले आहे की, तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यात पाम तेल, फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचा समावेश आहे (डुक्कर चरबी) आढळले. ही प्रयोगशाळा पशुखाद्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करते.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार