पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कोणत्या मंत्र्यांकडे कोणता जिल्हा, वाचा संपूर्ण यादी

On
पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी

पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळ्यात आलं आहे. मस्साजोग सरपंच प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेले धनंजय मुंडे यांच्याकडे एकाही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली नाही. 

एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व  मुंबई शहराचे पालकमंत्रीपद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.  वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

Dhages

धनंजय मुंडेंना धक्का 

राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत  होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत.

कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री

WhatsApp Image 2025-01-18 at 8.53.30 PM

 

 
WhatsApp Image 2025-01-18 at 8.53.30 PMWhatsApp Image 2025-01-18 at 8.53.30 PM (1)

 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार