विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी 'योग्य तंत्रज्ञानाचा वापर' काळाची गरज : दशरथ पाटील
IIBच्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पसचे उद्घाटन
विद्यार्थ्यांसाठी 200 हायटेक संगणक वाताणुनुकूल सुसज्ज कम्प्युटर लॅबचे लोकार्पण
लातूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऑनलाईन परीक्षा पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी आणि सरावाद्वारे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयआयबी लातूर कॅम्पसने ही अत्याधुनिक लॅब साकारली आहे. 200 संगणकांसह वातानुकूलित हॉल, सुरक्षित वातावरण, आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणारा समर्पित स्टाफ यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत," असे प्रतिपादन आयआयबी इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी केले.
आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांसाठी 200 हायटेक संगणकांनी सुसज्ज कम्प्युटर लॅबचे उद्घाटन केले आहे. NEET आणि JEE परीक्षांसाठी ऑनलाईन (CBT) स्वरूपात सराव करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही लॅब महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी क्रांतिकारी पाऊल ठरले आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयआयबी इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील बोलत होते.
यावेळी आयआयबी टीमचे सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. दशरथ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी संस्थेच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमात JEE आणि NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी बॅच साइजमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परीक्षेतील सरावासाठी अधिकाधिक ऑनलाइन CBT स्वरूपाच्या चाचण्या घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Dhages
आयआयबी लातूरमधील नवीन कॅम्पस आणि अद्ययावत लॅबच्या उद्घाटन सोहळ्याला हजारो विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. आयआयबी संस्थेने लातूरसह महाराष्ट्रातील नांदेड, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, अकोला आणि छ. संभाजीनगर येथे देखील JEE व NEET परीक्षांसाठी विशेष ब्रांचेसची स्थापना केली आहे.
"आयआयबीचे उद्दिष्ट केवळ विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि अभियंता बनविण्याचे नाही, तर त्यांना यशस्वी जीवनशैली साठी सक्षम नागरिक बनवून, आत्मविश्वासपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या देखील सक्षम बनवणे आहे," असे संस्थेच्या टीमने सांगितले.
उदघाटन समारंभात आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी लॅबचे उद्घाटन केले. यावेळी आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक मा. दशरथ पाटील, शिक्षकवृंद, पालक आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते. या नव्या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कंप्युटर लॅबचे वैशिष्ट्ये
- 200 हायटेक संगणकांची सुविधा.
- वातानुकूलित अभ्यासहॉल
- सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित वातावरण
- ऑनलाईन CBT सरावासाठी विशेष ऑनलाईन अप्लिकेशन.
- आयआयबीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी अशाच नाविन्यपूर्ण सुविधा पुरवल्या जात असून, तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे उत्कृष्ट मिश्रण याचा लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
- आयआयबीच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवी दारे उघडली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.