दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार

दिल्लीतील प्रत्येक महिलेला महिन्याला 2500, गॅस सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी अन् बरचं काही..!

On
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार

BJP Manifesto for Delhi Assembly Election : दिल्लीची विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपलीये. भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करण्यासाठी भाजपने नव्या घोषणा केल्या आहेत.

दिल्लीत झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे केजरीवाल यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत घेरण्याचा प्रयत्न केलाय. 

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महत्त्वाच्या घोषणा

  • महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा ₹ 2,500 दिले जातील.
  • गरीब भगिनींना सिलिंडरवर ₹ 500 ची सबसिडी दिली जाईल आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल.
  • मातृ सुरक्षा वंदना अधिक बळकट करण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील आणि प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील.

Dhages

भाजपच्या जाहिरनाम्याबद्दल जेपी नड्डा काय काय म्हणाले?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये दिले जातील. पहिल्या कॅबिनेट बैठकीत समृद्धी योजनेचा निर्णय घेतला जाईल. दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केलाय.

 

दिल्लीत ज्या गरिब महिला आहेत, त्यांना एलपीजी सिलेंडरमध्ये 500 रुपयांची सबसिडी दिली जाईल. रंगपंचमी आणि दिवळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल. त्याच प्रमाणे मातृ सुरक्षा वंदना योजनेला आणखी ताकद दिली जाईल. यासाठी 6 कीट दिले जातील. प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये देखील दिले जातील.  

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार