5 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिले, नंतर प्रियकराने प्रतिभाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले

तब्बल 10 महिन्यानंतर भयंकर घटना आली उघडकीस; वाचा- हृदय पिळवटून टाकणारी खूनाची स्टोरी

On
5 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिले, नंतर प्रियकराने प्रतिभाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले

Boyfriend Kill Girlfriend And Kept Body In Fridge, भोपाळ : मध्य प्रदेशातील देवासमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  देवासमधील एका बंद घरात ठेवलेल्या फ्रिजमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितानुसार,  या महिलेची सुमारे १० महिन्यांपूर्वी हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. 

सदर महिला ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिच्या लिव्ह-इन पार्टनरने त्याच्या मित्राच्या मदतीने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचा साथीदार दुसऱ्या गुन्ह्यात राजस्थान कारागृहात कैद आहे. त्याला पोलिस कोठडीत घेण्याची तयारी सुरू आहे.

बंद खोलीत फ्रिज, फ्रिजमध्ये मिळाला मृतदेह 

देवास शहरातील बायपास रोडवर असलेल्या वृंदावन धाम कॉलनीत शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी भाडेकरू बलवीर सिंग यांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

यानंतर बँक नोट प्रेस पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्याची दार उघडलं. तेव्हा घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. या घरात एक फ्रीज होता. पोलिसांनी फ्रीज उघडून पाहिला असता त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर एफएसएल टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. बुधवारी रात्री बलवीरने या बंद घराचे कुलूप तोडून कुटुंबासह खोल्यांची साफसफाई केली होती. तेव्हा त्याने फ्रिज बंद केली. त्यानंतर या फ्रिजमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.

Dhages

१० महिन्यांपूर्वी घर सोडलं, पण फ्रिज तिथेच ठेवला

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै २०२३ मध्ये संजय पाटीदार यांना हे घर भाड्याने दिले होते. संजयने जून २०२४ मध्ये घर सोडलं. परंतु, त्याने फ्रिजसह त्याचे काही सामान दोन खोल्यांमध्ये सोडलं होतं. तिथे महिलेचा मृतदेह आढळून आला. दरम्यानच्या काळात संजय इथे ये-जा करत असे, पण तो घर पूर्णपणे रिकामे करत नव्हता आणि भाडंही देत नव्हता. 

संजय पाटीदारने घर सोडल्यानंतर जुलै महिन्यापासून बलवीर सिंग राजपूत आपल्या कुटुंबासह या घरात भाड्याने राहत होते. पाटीदारने या घरातील दोन खोल्यांना कुलूप लावून ठेवले होते. बुधवारी रात्री बलवीरने या खोल्या उघडून स्वच्छ करून फ्रिज बंद केला. शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी पुन्हा एकदा खोली उघडली असता, त्यातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
मार्च २०२४ पासून प्रतीभा दिसलीच नाही 

बलवीरच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. तपासादरम्यान असे आढळून आले की, बलवीरच्या आधी उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया पोलीस स्टेशन परिसरात राहणारा संजय पाटीदार या घरात राहत होता. प्रतिभा उर्फ पिंकी ही संजयसोबत राहत होती. मार्च २०२४ पासून प्रतिभाला कोणीही पाहिले नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. संजयने सांगितलं होतं की प्रतिभा तिच्या माहेरी गेली आहे. याची माहिती मिळताच एएसपी जयवीर भदौरिया यांच्यासह एक पथक संजयला अटक करण्यासाठी उज्जैनला पोहोचले.

संजय प्रतिभा राहत होते पाच वर्षांपासून एकत्र 

अटक केल्यानंतर संजयने सारंकाही सांगितलं, तो प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रतिभाला तीन वर्षे उज्जैनमध्ये ठेवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ते देवास येथे राहत होते. जानेवारी २०२४ पासून प्रतिभाने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लागला होता. 

पण, संजय आधीच विवाहित होता. त्यामुळे त्याने मित्र विनोद दवे याच्यासोबत तिचा खून करण्याचा कट रचला. मार्च महिन्यात प्रतिभाचा भाड्याच्या घरात गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. फ्रिज कापडाने झाकून ठेवला होता. जेणेकरुन कोणी तो उघडून पाहू नये. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास घेत आहेत. तसेच, मृत महिलेचीही माहिती घेतली जात आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार