रेशनकार्ड धारकांसाठी आता 'ही' नवीन प्रणाली येणार! जाणून घ्या सविस्तर!

On
रेशनकार्ड धारकांसाठी आता 'ही' नवीन प्रणाली येणार! जाणून घ्या सविस्तर!

New system now for ration card holders : वंदना वेदपाठक : शासनाने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लवकरच प्रिंट स्वरूपातील रेशन कार्ड बंद होणार आहे.

रेशन कार्ड प्रिंट स्वरूपात उपलब्ध होणार नाही. रेशनकार्डाची छपाई बंद करण्यात आली असल्यामुळे राज्यातील नागरिकांना आता ई-रेशनकार्डचा पर्याय वापरावा लागणार आहे.याबाबतची माहिती नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिली आहे.

जुन्या रेशनकार्डधारकांसाठी नो प्रॉब्लेम! 

परंतु याचा परिणाम जुन्या रेशनकार्डधारकांवर होणार नाही. त्यांना जुन्यास रेशनकार्डवरून योजनांचा लाभ घेता येईल. मात्र, नव्या अर्जदारांना प्रिंट स्वरूपात रेशनकार्ड दिले जाणार नाही. याऐवजी ई-रेशनकार्ड प्रणाली लागू करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, ई-रेशनकार्डमध्ये पिवळे, पांढरे आणि केशरी रंगाच्या कार्डचा देखील समावेश असणार आहे. यामुळे लाभार्थी कोणत्या गटात येतात हे समजेल.

Dhages

रेशन आणि आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य

आणखी महत्त्वाचं म्हणजे रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य करण्यात आल्याने सर्व नोंदी डिजिटल माध्यमातून व्यवस्थापित केल्या जात आहेत. परिणामी प्रिंट स्वरूपातील रेशनकार्डची गरज कमी झाली आहे.

राज्य सरकारकडे उरलेली शिधापत्रिका वाटप झाल्यानंतर फक्त ई-रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. परिणामी, ई-रेशनकार्डमुळे डिजिटल पारदर्शकता वाढेल, यात शंकाच नाही! 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार