12 वी परीक्षेचे प्रवेशपत्र झाले उपलब्ध, ऑनलाईन प्रवेशपत्र कसे काढणार; जाणून घ्या प्रक्रिया
12th exam admit card : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, शुक्रवारपासून बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन आपापले प्रवेश पत्र तपासावेत. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी - मार्चमध्ये होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी – मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून दि.१० ऑनलाइन उपलब्ध झाले आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे. राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी काही दिवस लवकर परीक्षा सुरू होत आहे.
Dhages
विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन प्रवेश पत्र :-
बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
प्रवेश पत्र हरवल्यास काय करता येईल:-
प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून विद्यार्थ्यांना मिळेल. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.