'नांदेडचा आम्हाला बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका'

नांदेडमध्ये सकल मराठा समाज आक्रमक, बीड पाठोपाठ दुसऱ्या जिल्ह्यातही विरोध, संतोष देशमुख हत्या प्रकरण

On
'नांदेडचा आम्हाला बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका'

Entire Maratha community opposes Dhananjay Munde and Pankaja Munde : राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी झाला असून आता पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळेही पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडेंना देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्र्‍यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी व सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता, बीडनंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मुंडेंना नको, असा सूर उमटत असून नांदेडमधील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज ती भूमिका मांडली. तर आंदोलन देखील केले.   

त्यामुळे, पालकमंत्रीपदावरुन मुंडे अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापू्र्वीच पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली जातील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला जाण्यापूर्वीच ही नावे जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, पुढील 2 ते 3 दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होणार आहेत. 

नांदेडमध्ये 18 जानेवारीचा मोर्चा रद्द, पण....

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचा हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषदेत दिली. बीडमधील घटनाप्रकरणी आत्तापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण होत आहेत.

याप्रकरणाच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत, त्यामुळे हा मोर्चा हा स्थगित केला आहे. मात्र, नांदेडचे पालकमंत्रीपद मुंडे बंधु-भगिनींपैकी कोणालाही नको, जर नांदेडला पालकमंत्री म्हणून मुंडेंना पदभार दिल्यास इथला गोर-गरीब समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच येथील मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे. 

Dhages

बीडचा नांदेड करायचा नाही, मराठा समाजाचा विरोध

यदा कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल बीडचा बिहार झालाय. पण आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही, नांदेड ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. या राजधानीत सारे गुण्या-गोविंदाने राहतात,  त्यामुळे, राज्य सरकारला विनंती आहे की, बीडची संस्कृती नांदेडमध्ये रूजू नये म्हणून पालकमंत्री मुंडे बंधुंना नको.

नांदडेचे पालकमंत्री पद मुंडे बंधू किंवा भगिनी कोणालाही नको, असे नांदेडच्या सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता पुढील दोन दिवसांत राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा होणार असून नांदेडच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार