Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?

देवेंद्र फडणवीस सरकारकडून मोठी अपडेट आली समोर, वाचा काय म्हणाल्या आदिती तटकरे

On
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?

Ladki Bahin Yojana : ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

गेल्यावर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जानेवारीचे पैसे देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

जानेवारीचे पैसे कधी मिळणार?  

जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या पैशांचा लाभ मिळाला आहे. जानेवारीचे पैसे देखील येत्या 26 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील अशी माहिती याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील असं देखील त्या म्हणाल्या आहेत. 

दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे. 

Dhages

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू, या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळून दिलं आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावर बोलताना गुरुवारी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार