लातूरात बांगलादेशी, पाकिस्तानी व रोहिंग्या अवैध घुसखोर असण्याची शक्यता!
कारवाईसाठी हिंदूत्व जागर संघटनेचे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला निवेदन
लातूर : धुळे, नांदेड, भोकरदन, मालेगाव, जळगाव येथे बांगलादेशी घुसखोर नागरिक निदर्शनास आले असून पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याच्या घटना घडत असताना लातूर शहरात व जिल्ह्यात त्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हिंदुत्व जागर या संघटनेने गुरुवार, दिनांक 09 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना भेट देऊन याबाबत शोध मोहीम राबवावी तसेच घुसखोर नागरिक व त्यांना आश्रय देणारे यावर कडक कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात कळविण्यात आले आहे की, घुसखोरांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. मूळ भारतीय नागरिकांचे संविधानिक हक्क अबाधित राखण्याची तसेच सुरक्षेची जिम्मेदारी ही भारत सरकारची व प्रशासनाची आहे. ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, अशा घुसखोरांचा शोध घेणे व त्यांच्यावर कडक कार्यवाही करणे ही काळाची गरज आहे.
लातूरात रस्त्याच्या कडेला विविध छोटे व्यवसाय करणाऱ्यांच्या संख्येत भर पडत असुन सातत्याने नविन चेहरे असणारे त्यांची वेशभूषा, बोलीभाषा, भारतीय हिंदी भाषेतील लयाचे अंतर पाहता हे घुसखोर असल्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय यांच्याकडे असलेले बनावट कागदपञे याचीही कसुन चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत या निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
Dhages
घुसखोरांमुळे देश्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून धार्मिक शोभयात्रांवर दगडफेक, ट्रेन घातपात करण्याचे प्रयत्न, दंगली घडवण्याचे प्रकरण वाढ होत आहे. हे घुसखोर खोटी कागदपत्र बनवून सर्व शासकीय योजनांचा तसेच फ्री राशनचा लाभ घेत आहेत. इन्कम टॅक्स, मालमत्ता कर, पाणी कर, जीएसटी व इतर कर भरणा करणारी हे भारतीय नागरिक आहेत आणि आमच्याच कराच्या पैशावर घुसखोरांना पोसले जात आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हिंदुत्व जागर संघटनेचे अध्यक्ष मनोज सुर्यवंशी, उपाध्यक्ष संतोष तोष्णीवाल, सचिव शाम भराडिया, सहसचिव महादेव दभणे, कोषाध्यक्ष शिवकांत ब्रिजवासी, सदस्य व्यंकटेश कुलकर्णी, दिलीपचंद चोपडा, संतोष पांचाळ, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश पाटील, कन्हैय्यालाल जंत्रे उपस्थित होते.