मनु भाकर, डी गुकेशसह चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान; महाराष्ट्रातील स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Khel Ratna And Arjuna Awards 2024 : राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार जणांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला
राष्ट्रपतींनी कोल्हापूरचा ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.
आजीवन अर्जुन पुरस्कार श्रेणीत पेटकरचा समावेश
अर्जुन पुरस्कार (आजीवन) प्राप्तकर्त्यांमध्ये भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा समावेश आहे, ज्यांनी 1972 पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पदक जिंकले होते. 22 वर्षीय मनू भाकरने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली ॲथलीट आहे. तर 18 वर्षीय डी गुकेश गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता ठरला. ही कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे.
#WATCH | President Droupadi Murmu confers Major Dhyan Chand Khel Ratna Award, 2024 on Chess World Champion Gukesh D at Rashtrapati Bhavan
— ANI (@ANI) January 17, 2025
(Source: President of India's Twitter handle) pic.twitter.com/2Roca8yaxf
दुसरीकडे, हरमनप्रीत सिंग टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचा एक भाग होता. दुसरीकडे, प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या 32 खेळाडूंपैकी 17 पॅरा-ॲथलीट आहेत.
Dhages
या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
४. मनू भाकर (शूटिंग)
यांना अर्जुन पुरस्कार मिळाला
1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)