मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण; वाल्मीक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी

हत्येच्या सहभागाची होणार कसून चौकशी; जिल्हा न्यायालय परिसरात समर्थक, विरोधकांची घोषणाबाजी

On
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण; वाल्मीक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी

खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली.

सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे. 

कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची घोषणाबाजी

वाल्मीक कराडला जेलकडे नेत असताना बीड न्यायालयाबाहेर वाल्मीक कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी वकील हेमा पिंपळे यांनी केली आहे. यावेळी वाल्मीक कराड समर्थक आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी वाल्मीक कराड समर्थकांना ताब्यात घेतले आहे. 

वाल्मीक कराडला जेलमध्ये नेताना तगडा पोलिस बंदोबस्त

वाल्मीक कराडला केजहून बीडला आणत असताना चार अनोळखी वाहने पोलिसांच्या ताफ्यात शिरली होती. त्यामुळे आता सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मीक कराडला जेलमध्ये नेण्यात येत असताना न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस ताफ्यात घुसलेल्या अनोळखी वाहनांचा आणि वाहनचालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Dhages

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण, थोड्याच वेळात निर्णय

बीड जिल्हा सत्र न्यायालयातील दोन्ही बाजूंचा व्यक्तीवाद पूर्ण झाला आहे. थोड्याच वेळात कोर्टाचा निकाल दिला जाईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांवर न्यायाधीशांकडून देखील प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 

फोन कॉलवर कराडला आरोपी बनवले का? कोर्टाचा सवाल

कोणत्याही आरोपींनी वाल्मीक कराडचे नाव घेतले नाही, अशी बाजू त्याच्या वकिलांनी कोर्टात मांडली होती. त्यावर हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला फक्त फोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? वाल्मीक कराडचा सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री केली होती का? असे प्रश्न न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना केले आहे. 

कराडची अटक बेकायदेशीर, बचाव पक्षाच्या वकिलाचा युक्तीवाद

सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांमध्ये नेमका संबंध काय आहे? याचा तपास करायचा असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे.

वाल्मीक कराडची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्याच्यावर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. कोणत्याही आरोपीने वाल्मीक कराडचे नाव घेतले नाही, असा युक्तीवाद वाल्मीक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार