केंद्रीय कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा; सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती विनंती, केंद्राने दिली मान्यता
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 13 जानेवारी पर्यंत करण्याचे होते निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री चौहान यांना फोन करतक मदतवाढ देण्याची मागणी केला होती. त्यांच्या या मागणीला यश आलं आहे.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान मोदींसह कृषीमंत्री चौहान यांचे फडणवीसांनी मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती.. त्यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा देखील केली होती. ही मागणी तातडीने कृषीमंत्री चौहान यांनी मान्य करत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Dhages
नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीची तयारी ऑक्टोबरमध्येच करा
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी.