ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची कारवाई; सुरेश कुटेंची 1,433 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आरोप

On
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची कारवाई; सुरेश कुटेंची 1,433 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

Dyanradha Multistate Fraud, ED Action Mode : मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची ईडीने स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1,433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले. ठेवीदारांना 12-14% व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली.

ईडीच्या तपासात हे समोर आले की, कुटे ग्रुपने या रकमेचा गैरवापर केला आणि अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतले. कुटे आणि कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून एमपीआयडी कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 दरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

Dhages

मराठवाड्यात उडाली खळबळ

ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी ईडीचा तपास अद्याप सुरू आहे. ईडीने 9 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात या कारवाईची माहिती दिली. 

विविध शाखांची संपत्ती जप्त

या प्रकरणावर पुढील कायदेशीर पाऊल कसे उचलले जाईल, याकडे ठेवीदारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच ED ने ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त केली होती. 

ईडीकडून एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.  

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार