वाल्मिक कराडला मोक्का लावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू, मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा

धनंजय देशमुखही टॉवरवर चढून आंदोलन करणार

On
वाल्मिक कराडला मोक्का लावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू, मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा

Santosh Deshmukh Murder Case Update :  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख हे सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी मंगळवारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करावे आणि त्यालाही मोक्का लावण्यात यावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी हे पाऊल उचलणार आहेत.  

वाल्मिक कराडला मोक्का का लावला जात नाही? 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही. खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केलं जात नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला. पण त्याला मोक्का लावण्यात येत नाही अशी तक्रार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोक्का लावा या मागणीसाठी गावकरी बुधवारी सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.

Dhages

टॉवरवर चढून उद्या आंदोलन करणार

संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी बुधवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. 

वाल्मिक कराडवर मोक्का का लावत नाही? 

 खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी धनंजय देशमुखांची मागणी आहे. वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. 

वाल्मिक कराडने मोठी माया जमवली

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊन गेला. त्याच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. यात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले. या प्रकरणात वाल्मिक कराडने भरपूर संपत्ती जमावली, त्याच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. 

मनोज जरांगे यांचा थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

सुरेश धस यांनी थेट नाव घेतलं नसलं, तरी आकाच्या आडून धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.  यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केलं आहे. आता माझ्यावर केसेसचा सपाटा लावल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच 25 जानेवारीच्या उपोषणानंतर त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.  

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार