राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज : पी. एस. काळे
ढगेज् इंग्लिश अकॅडमीमध्ये मॉसाहेब जिजाऊ जयंती व विवेकानंद जयंती उत्साहात संपन्न
लातूर/प्रतिनिधी : येथील ढगेज् इंग्लिश अकॅडमी येथे रविवार (दि.१२) रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढगेज् अकॅडमीचे प्रमुख प्राचार्य व्यंकटराव ढगे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी पी. एस. काळे, विषय तज्ञ सतीश सातपुते, प्रा.सचिदानंद ढगे, प्रसिद्ध वक्ते प्रा. गणेश बेळंबे, प्रा.संभाजी नवघरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अकॅडमीमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या काळात या देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जिजाऊ आणि विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पी. एस. काळे यांनी केले.
Dhages
प्रा. डॉ.गणेश बेळंबे यांनीही राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रा. संभाजी नवघरे यांनीही या दोन्ही महान विभूती यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यांचे योगदान
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे संचालक प्रा.सचिदानंद ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विवेकानंद ढगे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ढगेज् इंग्लिश अकॅडमीमधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.