विराट-अनुष्काने घेतले प्रेमानंद महाराजांचे दर्शन; दोन्ही मुले अकाय-वामिकाही होते हजर
अभिनेत्री म्हणाली- माझ्या मुलांना भक्ती प्रेम द्या; पाहा- भेटीचा VIDEO
Anushka Sharma and Virat Kohli meet Premanand Maharaj : अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली शुक्रवारी प्रेमानंद जी महाराजांकडे पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी वामिका आणि मुलगा अकाय देखील दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट श्री प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर महाराजांच्या समोर पोहोचताच दोघांनीही प्रथम साष्टांग नमस्कार घातला.
Virat Kohli and Anushka Sharma Along With Daughter Vamika and Son Akaay Visit Premanand Maharaj At Vrindavan Dham!⚡
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) January 10, 2025
Maharaj Ji said "It's your Prarabdh Bhog which gives tough times. Do your Practice & Naam Jaap. Once Prarabdh Bhog is over, you'll get back form" pic.twitter.com/t3RW68iEEV
यानंतर अनुष्का शर्माही प्रेमानंद जी महाराजांना प्रश्न विचारताना दिसली. अभिनेत्री म्हणते, 'तुम्ही मला फक्त प्रेम भक्ती द्या'. यावर स्वामीजी म्हणतात की आपापल्या कारकिर्दीत एवढ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही ते दोघेही भगवंताच्या भक्तीत लीन आहेत याचा मला आनंद आहे.