मुलांचं सर्दी-पडसं होतंय छूमंतर.. करा 'हे' घरगुती उपाय, वाचा सविस्तर
थंडीच्या दिवसांत लहान मुलांना सर्दी-पडशाचा त्रास जास्त होतो. बदलत्या हवामानात लहान मुले सारखी आजारी पडतात. अशा वेळी दरवेळी दवाखान्यात नेताना पालकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण पाहूयात लहान मलांच्या सर्दी पडशासाठी काय आहेत घरगूती उपाय.
घरच्या घरी अशी पळवा सर्दी
१. सर्दीपासून आराम मिळण्यासाठी मुलांना स्टीम वापरुन पहा. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याला वाफ द्या. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि मुलाला 10 ते 15 मिनिटे ती गरम वाफ घ्यायला लावा.
२. नैसर्गिक उपाय म्हणून मधही वापरु शकता. मध खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी आणि आजारी मुलाला झोपायला मदत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. मध सर्दीवर चांगले कार्य करतो. कारण त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. घशाची खवखवही मधामुळे थांबते.
३. लहान मुलांच्या सर्दीवर मालिशही प्रभावी काम करते. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मसाज सर्वात प्रभावी ठरतो. मोहरी तेल किंवा लसणाच्या तेलाने बाळाच्या छाती, पाठ आणि मानेला मसाज करा. बाळाला तत्काळ आराम मिळण्यासाठी बाळाचे तळवे आणि पाय तेलाने झाकून ठेवा.
४. नियमितपणे पाणी प्यायल्याने सर्दीशी लढायला मदत होईल, घशाची जळजळ कमी होते आणि संसर्गही दूर होतो.
५. सर्दीत होणारी घशाची खवखवणे शांत करण्यासाठी, मुलाला दिवसातून दोनदा कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्यास सांगा. खारट पाण्यामुळे वेदना आणि घशाच्या संसर्गापासून त्वरित आराम मिळतो. परंतु सहा वर्षांखालील मुलांसाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगू नये. लहान मुले मिठाचं पाणी गिळण्याचाही धोका असतो.
६. हळदीचं दूधही सर्दीसाठी चांगला परिणाम करतं. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे खोकला आणि सर्दी यांसारख्या विषाणूजन्य संसर्गांवर चांगला आराम मिळतो. एक ग्लास कोमट दुधात हळद पावडर टाकून रोज रात्री मुलाला दिल्यावर चांगला आराम पडतो. शिवाय दुधातील कॅल्शियम बाळाला ऊर्जाही देते.
सर्दी जास्त असेल तर डाँक्टरला दाखवा
अनेकदा लहान मुलांच्या सर्दीनंतर त्याच्या छातीतही कफ जमा होतो. त्यावेळी त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपायाने लहान मुलांना नक्कीच आराम पडतो. मात्र आपल्या बाळाची सर्दी नेमकी कोणत्या प्रकारची आहे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही मतत्त्वाचा ठरतो.