भाजप फक्त खोटे बोलतेय!, काश्मीरमध्ये PM मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल

म्हणाले- ‘मन की बात’ म्हटल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी का बोलत नाहीत

On
भाजप फक्त खोटे बोलतेय!, काश्मीरमध्ये PM मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पूंछमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान लोकसभा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार आरोप केले. भाजप आणि आरएसएस देशात फुट पाडत असून देशात ते हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. 

भाजप आणि आरएसएसच्या कृतींमुळे शत्रुत्व आणि हिंसेला चालना मिळाली आहे, यामुळे देशाची एकता आणि शांतता बिघडली आहे. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा अशी आमची इच्छा आहे. काश्मीरी जनतेला संबोधन करताना ते म्हणालेस आम्ही तुमच्या राज्याचा दर्जा परत देण्यासाठी आधी भाजपवर दबाव आणू, जर त्यांनी तुम्हाला ते दिले नाही तर आम्ही तुम्हाला राज्याचा दर्जा परत देऊ. तो तुमचा अधिकार आहे, तुमचा लोकशाही अधिकार आहे आणि तो तुम्हाला द्यायचा आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएस जम्मू-काश्मीर आणि इतर राज्यांमध्ये द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत. त्यांना फक्तद्वेष कसा पसरवायचा हे माहीत आहे आणि त्यांचे राजकारणही द्वेषाचे आहे. 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पूंछ येथे पोहोचलेले राहुल गांधी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये एक राजा आणून बसवला आहे. ते म्हणजे उपराज्यपाल.. ते बाहेरचे आहेत, जम्मू-काश्मीरचे नाहीत. जम्मू-काश्मीरच्या जनतेला हवा असलेला विकास हे साध्य करु शकणारी व्यक्ती नाही, अशी उपराज्यपालांसंबधीत टीका त्यांनी केली. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार