हाती बंदूक अन् 'बदलापूरचा बदला पूर्ण' मुंबईत बॅनरने देवाभाऊंची रंगली चर्चा

सुप्रिया सुळे म्हणाल्या- तुम्ही बंदूक दाखवाल तर आम्ही संविधान दाखवू, मुलांवर काय संस्कार होतील

On
हाती बंदूक अन् 'बदलापूरचा बदला पूर्ण' मुंबईत बॅनरने देवाभाऊंची रंगली चर्चा

Supriya Sule on Devendra Fadnavis Banner With Gun : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी हातात पिस्तूल असणाऱ्या बॅनरवरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे हे बॅनर फारच धक्कादायक आहे. हे बॅनर पाहणाऱ्या मुलांवर काय संस्कार होतील? असा कटू सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

बदलापूर लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काउंटर केले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यातच भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे एक वादग्रस्त बॅनर वांद्रे कलानगर परिसरात लावले आहे.

या बॅनरवर फडणवीस यांचे 2 फोटो आहेत. त्यातील एका फोटोत देवेंद्र यांच्या हातात पिस्तुल आहे, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात रायफल आहे. या बॅनवर 'बदला पुरा' असे दोन शब्द लिहिण्यात आलेत. त्यामुळे या बॅनरद्वारे एकप्रकारे अक्षय शिंदेचे एन्काउंटर करुन पोलिसांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याचा संदेश दिला आहे.

हे बॅनर माझ्यासाठी फार धक्कादायक

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जी मुले हे बॅनर पाहतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? आता या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरत आहे.

मिर्झापूरच्या गोष्टी टीव्ही सीरिजमध्येच चालतात. पण बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तेथून आम्हाला बंदुका दाखवल्या, तकर आम्ही त्यांना येथून संविधान दाखवू, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपला दिला. 


 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार