...जीव गेला तरी माघार नाही - हजारे, गोयकर; धनगर समाजाचे आंदोलन आक्रमक वळणावर 

लातूरातील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा 16 वा दिवस

On
...जीव गेला तरी माघार नाही - हजारे, गोयकर; धनगर समाजाचे आंदोलन आक्रमक वळणावर 

लातूर / प्रतिनिधी 

Dhangar community movement on aggressive turn :  धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस. टी) प्रवर्गात समावेश अध्यादेशाचा अंमलबजावणी व्हावी  या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल भोयकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले एसटी आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा जीव गेला तरी माघार नाही अशी आक्रमक भूमिका मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी आमरण उपोषणाच्या १६ व्या दिवशी घेतली आहे.

९ सप्टेंबर रोजी अनिल गोयकर  व चंद्रकांत हजारे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले; अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, रेल रोको आंदोलने झाले तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. त्यानंतर धनगर समाजाच्या सुरु असलेल्या उपोषणाला समाजातून पाठिंबा देत राज्यभरात रस्ता रोको, निवेदन आंदोलन करण्यात येत असून कांही ठिकाणी धनगर समाज आक्रमक झालेला ही दिसत आहे. आता जीव गेला तरी माघार नाही, असा आक्रमक पवित्रा मल्हारयोद्धा अनिल गोयकर चंद्रकांत हजारे, यांनी घेतला आहे. 

WhatsApp Image 2024-09-24 at 7.02.36 PM

आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले

महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची प्रमुख मागणीसाठी लातूरमधील मल्हार योध्ये चंद्रकांत हजारे व अनिल गोयेकर यांनी सुरूवात केलेले आंदोलनाचे लोण आता राज्यभर पसरले आहे. राज्यातून विविध स्तरातून हे आंदोलनं केली जात असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंढण आंदोलन, रास्तारोको, अशी आंदोलन केली जात आहेत. या आंदोलनात संपूर्ण धनगर समाज बांधव एकवटलेला दिसून येत आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार