World Suicide Prevention Day : तुमचा छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो, काय कराल?

भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वार्षिक प्रमाण झपाट्याने वाढत चालले, पालक म्हणून काय काळजी घ्याल

On
World Suicide Prevention Day : तुमचा छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो, काय कराल?

Rising rate of suicide : आत्महत्येच्या वाढत्या घटना हा गंभीर चिंतेचा विषय आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात. भारतातही ही समस्या मोठी चिंतेची बाब बनत आहे. एका नवीन अहवालानुसार, भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वार्षिक प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) 2024 च्या डेटावर आधारित, आत्महत्यांच्या एकूण संख्येत वार्षिक 2% वाढ झाली आहे, तर विद्यार्थी आत्महत्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण 4% पेक्षा जास्त आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

मानसोपचारर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येचे विचार गंभीर मानसिक आरोग्य समस्यांचे सूचक आहेत. यावरून हे देखील दिसून येते की ती व्यक्ती ब-याच काळापासून तणाव आणि नैराश्याने जगत आहे, ज्याचे वेळीच निदान आणि उपचार केले गेले असते तर परिस्थिती या पातळीपर्यंत बिघडण्यापासून रोखता आली असती.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जगभरातील आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी योजना तयार करणे या उद्देशाने साजरा केला जातो.

आत्महत्या रोखण्यात समाजाची भूमिका

तज्ज्ञांच्या मते,  समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्महत्या रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची, मित्रांची, नातेवाईकांची आणि सहकाऱ्यांची परिस्थिती आपल्या सर्वांनाच समजते. अशा लोकांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल किंवा निराशा जाणवत असेल, मग ती त्यांची मनस्थिती असो, वागणूक असो किंवा त्यांचे बोलणे असो,  त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अशा लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्याकडे लक्ष देणे आणि त्या व्यक्तीशी बोलणे संभाव्य आत्महत्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले

विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्येचे प्रमाण सध्या चर्चेत आहे. एका आकडेवाडीनुसार 2022 मध्ये आत्महत्या करणा-यांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त होते.  2021 ते 2022 दरम्यान विदर्थ्यांच्या आत्महत्येमध्ये 6% ने घट झाली आहे, तर विद्यार्थिनींच्या आत्महत्यांमध्ये 7% वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अनावश्यक दबाव, समवयस्कांशी तुलना यासारख्या परिस्थितीमुळे मानसिक ताण वाढत आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पालक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

एकमेकांशी तुलना करणे टाळा

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, आपले लक्ष मुलांच्या क्षमतांना चालना देण्यावर असले पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी उपयुक्त ठरेल, त्यांना एकमेकांशी स्पर्धा करण्यास प्रवृत्त करणारे नसावे. प्रत्येक संस्थेमध्ये एक पद्धतशीर, सर्वसमावेशक आणि मजबूत करिअर आणि कॉलेज समुपदेशन प्रणाली तयार करणे अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्य सुधारणे सारखे विषय देखील अध्यापन अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

आत्महत्या कशा रोखता येतील?

विद्यार्थ्यांशिवाय कौटुंबिक कलह आणि आर्थिक विवंचना हे देखील आत्महत्येचे कारण आहे. आत्महत्या रोखण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या वर्तनाकडे गांभीर्याने लक्ष द्या. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक बदल दिसले तर सावध राहा. त्या व्यक्तीशी बोला. कधीकधी फक्त या लोकांसाठी तिथे असणे चांगले असते. एखाद्या व्यक्तीला ऑआपली काळजी आहे हे त्यांच्या मनाला बळकट करते आणि आत्महत्येच्या विचारांची तीव्रता कमी करू शकते.अशा लोकांना शक्य तितक्या लवकर एखाद्या प्रोफेशन मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्यास सांगा. तुमचा छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो.

(टीप: हा लेख इंटरनेटवरील माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी आपण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार