'बिग बॉस मराठी -5' चे सीजन गाजवणार मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख! 

On
'बिग बॉस मराठी -5' चे सीजन गाजवणार मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख! 

मुंबई : बिग बॉस मराठी ५ च्या' नव्या पर्वाचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी मध्ये हिट भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन गाजवायला सज्ज  झालेला आहे. नव्या प्रोमोत रितेश सुपर कूल अंदाजात पहायला मिळतोय.

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश ची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली. आणि आता नव्या प्रोमोमध्येही त्याची कमाल स्टाईल पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश देशमुख सज्ज आहे. 

प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय, 'तंटा नाय तर घंटा नाय... ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच... तो पण माझ्या स्टाईलने" अशाप्रकारे रितेशचा भन्नाट अंदाज पाहायला मिळतोय. आता लवकरच 'बिग बॉस'चा आवाज घुमणार आहे.

आगळावेगळा रिअॅलिटी शो म्हणून 'BIGG BOSS'कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील.  रितेश सुद्धा आपल्या अनोख्या अंदाजात यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.  लवकरच कलर्स मराठी आणि Jio Cinema वर  सुद्धा बिग बॉस चं नवं सीजन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार