संबलपुरी गायिका रुक्साना बानो यांचे निधन; 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या 

इतर गायकांनी विष दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

On
संबलपुरी गायिका रुक्साना बानो यांचे निधन; 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या 

Sambalpuri Singer Ruksana Bano Passed Away :  लोकगीतांनी आपला ठसा उमटवणाऱ्या संबळपुरी गायिका रुक्साना बानो यांचं निधन झालं आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून भुवनेश्वरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेले होते.

डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही, 27 वर्षीय तरुण गायीकेला वाचवता आले नाही. रुक्सानाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी इतर संबळपुरी गायकांवर तिच्यावर विषप्रयोग करून हत्या केल्याचा आरोप केला आहे.

रुक्साना बानो यांचे 18 सप्टेंबर रोजी निधन झाले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी इतर संबळपुरी गायकांवर आरोप केला आहे की त्यांनी त्यांच्या मुलीला मत्सरातून विष पाजले होते, त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. सुमारे 15 दिवसांपूर्वी रुक्साना बोलंगीर येथे एका गाण्याचे शूटिंग करत असताना तिची तब्येत बिघडली.

प्रकृती बिघडल्याने तिला 27 ऑगस्ट रोजी भवानी पटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर तिला बोलंगीर भीमा वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. येथेही आराम न मिळाल्याने तिला प्रथम बारगढ येथील रुग्णालयात आणि नंतर भुवनेश्वर येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले. रुक्सानाच्या मृत्यूच्या कारणाबाबत सध्या एम्सकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कुटुंबीयांचा आरोप- यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या

रुक्सानाची बहीण रुबी हिने नुकत्याच एका मीडिया स्टेटमेंटमध्ये दावा केला आहे की, शूटिंगदरम्यान तिच्या बहिणीला ज्यूस देण्यात आला होता, जे प्यायल्यानंतर तिची तब्येत बिघडली. रुक्सानाच्या आईचे म्हणणे आहे की तिच्या प्रतिस्पर्धी गायिकेने तिला विष दिले आहे. याआधीही रुक्सानाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असा दावाही आईने केला आहे.

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार