अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात आता 'नवा राडा', पाहा- VIDEO

On
अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात आता 'नवा राडा', पाहा- VIDEO

Big Boss : अभिनेता रितेश देशमुखच्या सुत्रसंचालनामुळे यंदा चांगलाच चर्चेत असलेला बिग बॉस मराठीचा शो तुफान राडा आणि गोंधळ घालणारा ठरत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुरन्सने यंदाचा बिग बॉस शो गाजवला आणि तुफान वाजवलाही. त्यातच, आता यंदाचा सिझन अंतिम टप्प्यात असताना बिग बॉसच्या घरात आता अभिजीत बिचुकलेंची एंट्री झाल्याचं दिसून येत आहे.

कर्लर्स मराठीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तर, मै हूँ डॉन गाण्यावर एंट्री करताच बिचुकले घरातही डॉनप्रमाणे वागताना दिसून येतात.  बिग बॉस मराठीचं घर हे आतापर्यंत अनेक सदस्यांनी गाजवलं.

पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सिझन प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता पाचव्या सिझनमध्येही घरातले राडे, भांडणं या सगळ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त होत असतात. त्यातच आता पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आता अभिजीत बिचुकलेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांनी नुकतेच रेडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्यही केलं होतं. तसेच,  माझ्याशिवाय बिग बॉस मराठी चालणारच नाही, असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला होता.

त्यानुसार, आता खरंच अभिजीत बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज रात्री होणाऱ्या शोमध्ये अभिजीत बिचकुलेंची दमदार एंट्री होत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा फूट टू राडा पाहायला मिळणार आहे.   

मै हूँ डॉन गाण्यावर अभिजीत बिचुकलेंची एंट्री होताच, त्याने अंकिताला खडसावलं. तसेच, नेहमीच्या स्टाईलने पुन्हा एकदा राडा करणार असल्याचे संकेतही दिले आहेत. अंकिताने सूरजला नॉमीनेट केल्याबद्दल 'बहीण असं कधीच करत नाही, तुमचा कुचकेपणा दिसला' अशा शब्दात अकिंतावर आगपाखड केलीय. 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार