महिलांनो, तुमचे 1500 आले का? लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी

On
महिलांनो, तुमचे 1500 आले का? लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

 Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojna  : राज्यभरातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

सरकारने हा हप्ता 29 सप्टेंबरपासून जमा होण्याची घोषणा केली होती. पण तत्पूर्वीच हा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली होती. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सरकारने गत महिन्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग केले होते.

त्यानंतर आता या योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासंबंधीचे अनेक मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येऊन आदळलेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेच्या लाभासाठी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात तीन हप्ते म्हणजे एकूण 4500 रुपये जमा होत आहेत. तर पहिल्या टप्प्यात नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत आहेत.

लाभासाठी आधार क्रमांक लिंक असणे गरजेचे

सरकारच्या आकडेवारीनुसार, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 2 लाख 31 हजार 294 महिलांनी अर्ज केलेत. पण त्यापैकी अनेक महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाला संलग्नित केले नसल्यामुळे हजारो महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे. या महिलांनी आधार क्रमांक लिंक केल्यानंतर त्यांच्याही खात्यांवर या योजनेचा लाभ ट्रान्सफर केला जाणार आहे.

तुमच्या खात्यात पैसै जमा झाले का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत तुमचे बँक खाते व आधार क्रमांक लिंक असेल तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी सर्वप्रथम आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. खात्याला आधार क्रमांक लिंक असेल तर लगेच संबंधित बँकेचे अॅप किंवा मोबाईल मेसेज यंत्रणेद्वारे आपल्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही हे तपासून घ्यावे. बँकिंग अॅपद्वारे तपासणी करणाऱ्या महिलांनी आपल्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे जमा झाले किंवा नाही हे तपासून पहावे. ज्यांच्याकडे ही सुविधा नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन त्यासंबंधीची विचारणा करावी. 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार