अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, पोलिसांनी केला मोठा खुलासा

दोन शक्यता वर्तवल्या; अनिल अरोरांच्या पत्नी म्हणाल्या- माझ्या नवऱ्याला कोणताही आजार नव्हता 

On
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, पोलिसांनी केला मोठा खुलासा

Actress Malaika Arora father suicide Update :  अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचे बुधवारी निधन झाले. सकाळी 9 वाजता अनिल अरोरा (62) यांचा मृतदेह त्यांच्या वांद्रे येथील आयशा मनोर अपार्टमेंटमध्ये पडलेला आढळून आला. त्यांच्या मृत्यूच्या वृत्तावर दोन प्रकारच्या चर्चा समोर येत आहेत. 

एकीकडे डीसीपी राज तिलक रोशन म्हणाले की, प्राथमिक तपासात आत्महत्येचे प्रकरण समोर येत आहे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम प्रत्येक अँगल लक्षात घेऊन तपास करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. 

त्याचवेळी मलायकाच्या जवळच्या मित्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला हा अपघात असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह बाबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

मलायकाला वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच तिने तातडीने मुंबई गाठली. मलायकाच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, अनिल अरोरा यांनी आत्महत्या केलेली नाही, हा अपघात आहे, याचा खुलासा पोलिसांच्या पंचनामा करण्यात येईल.

Ladda

पत्नीने पोलिसांना सांगितले- त्यांना कोणताही आजार नाही

अनिल यांची पत्नी आणि मलायकाची आई जॉयस यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अनिल रोज सकाळी बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत असे. बुधवारी सकाळी दिवाणखान्यात अनिल यांची चप्पल पाहिल्यानंतर ती बाल्कनीत गेली. अनिल कुठेच दिसले नाही तेव्हा त्यांनी खाली पाहिले. पहारेकरी मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता. अनिल कोणत्याही आजाराने ग्रस्त नसल्याचे जॉयस यांनी सांगितले. त्यांना फक्त गुडघ्यात दुखत होते. त्यांनी मर्चंट नेव्हीकडून व्हीआरएस घेतले होते. जॉयसने असेही सांगितले की तिचा आणि अनिलचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता पण दोघेही काही वर्षांपासून एकत्र राहत होते.  

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार