दिलेल्या आश्वासनांची मोदी शहांनी पूर्तता केली नाही, त्यांनी काश्मीरसाठी काय केले 

कॉंग्रेस अध्यक्षांचा भाजप सरकारवर निशाणा; जम्मू काश्मीरची निवडणूक तापली 

On
दिलेल्या आश्वासनांची मोदी शहांनी पूर्तता केली नाही, त्यांनी काश्मीरसाठी काय केले 

Jammu and Kashmir Assembly Election 2024  : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे शनिवारी दि.21 सप्टेंबर रोजी जम्मू येथे पोहोचले. येथे त्यांनी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे उमेदवार ताराचंद यांच्यासाठी प्रचार सभा घेतला. यावेळी खरगे यांनी अमित शहा, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने जम्मू आणि काश्मीरसाठी नेमकं काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

मल्लिकार्जुन म्हणाले की, भाजपचा कोणताही अजेंडा नाही. भाजप आणि आरएसएसचे नेते नेहमीच काँग्रेस नेत्यांची जीभ कापण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार-खासदार म्हणतात, 'तुम्हीही तुमच्या आजीप्रमाणेच नशिबाला सामोरे जाल. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?

राहुल गांधींनाही दहशतवादी म्हटले होते, मात्र काँग्रेस पक्ष त्यांना घाबरत नाही. खरगे म्हणाले. एवढेच नाही तर काँग्रेसला पाकिस्तानशी पुन्हा चर्चा करायची आहे असे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे काही म्हटले आहे, ते सर्व खोटे आहे. 

खरगे म्हणाले की, मोदी शहांना कायमच देशातील राजकारणाचा मुद्दा वळवायचा आहे. आम्ही कधी बिर्याणी खायला गेलो नाही किंवा त्याला मिठी मारायला गेलो नाही. एवढेच नाही तर आम्ही सात हमी दिल्या आहेत. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे हे आमचे प्राधान्य आहे. दुसरी हमी म्हणजे आरोग्य विमा योजना प्रदान करणे जी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचे कव्हरेज दिले जाईल. 

कुटुंबातील महिला प्रमुखांना मासिक 3,000 रुपयांचा लाभ दिला जाईल. महिलांना 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाणार आहे. ओबीसींना त्यांचे हक्क संविधानात दिलेले असतील. आम्ही सत्तेत आल्यावर 1 लाख नोकऱ्या रिक्त असतील, त्या लगेच केल्या जातील. 

भाजपने 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले होते पण ते 5 वर्षांपासून इथे आहेत पण त्यांनी काहीच केले नाही. तिरुपती प्रसादम वादावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, तपास सुरू असून जो कोणी पुढे येईल, अशा गोष्टी घडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल कारण ती योग्य नाही कारण त्याचा यात्रेकरूंवर परिणाम होतो. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार