Russia-Ukraine War : रशियाने केला युक्रेनवर ICBM हल्ला, थरारक घडलं!
यु्क्रेनने केलेल्या हल्ल्याला दिले प्रत्युत्तर, वाचा सविस्तर
Russia-Ukraine War : जगभरात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचे कारण देखील भयंकर आहे. कारण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचे नाव घेत नाही.
RCC New
युक्रेनने अमेरिकेच्या क्षेपणास्त्राने रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला आहे. यानंतर पुतिन यांची असे धोकादायक पाऊल उचलले की त्याने संपूर्ण जग हादरले आहे. रशियाने प्रथमच युक्रेनवर ICBM (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल) हल्ला केला आहे. लांब पल्ल्याचे ICBM अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. रशियाने ICBM च्या माध्यमातून अण्वस्त्र हल्ला केला आहे की अन्य कोणत्याही प्रकारच्या विध्वंसक शस्त्राचा वापर केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
रशियावर अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या अमेरिकन क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ICBMs वापरण्याची परवानगी दिली आहे. युक्रेनमधून रशियाच्या अंतर्गत भागांवर अनेक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत.
युक्रेनने सांगितले की, ICBM हल्ला देशाच्या मध्य-पूर्वेला असलेल्या डनिप्रो शहरात करण्यात आला. रशियाने युक्रेनवर ज्या ICBM ने हल्ला केला आह ते अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची रचना आण्विक वारहेडसाठीही करण्यात आली आहे. मात्र, रशियन ICBM मध्ये कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरली गेली हे युक्रेनने अद्याप सांगितलेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार हा अण्वस्त्र हल्ला नसल्याचे देखील सांगितले जात आहे.
तिसऱ्या महायुद्धाची भीती
रशियाने युक्रेनशी लढण्यासाठी हजारो उत्तर कोरियाचे सैनिक उतरवले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली. यानंतर युक्रेनने अमेरिकन आणि ब्रिटिश क्षेपणास्त्रांच्या मदतीने रशियावर अनेक हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वात जास्त अणुबॉम्ब असलेल्या रशियाने आपल्या अणु तत्त्वांमध्ये बदल केला आहे. रशियाने पहिल्यांदाच युक्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. रशियन हल्ल्याच्या भीतीने अनेक देशांनी युक्रेनमधील आपले दूतावास बंद केले आहेत. बदललेल्या परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे.