विद्यार्थ्यांनो लागा परीक्षेच्या तयारीला; दहावी-बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर, वाचा कधी कोणता पेपर! 

On
विद्यार्थ्यांनो लागा परीक्षेच्या तयारीला; दहावी-बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर, वाचा कधी कोणता पेपर! 

SSC & HSC Board Exam Time Table 2025 : विद्यार्थ्यांसाठी मोठी व महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले. चला तर जाणून घेऊया परीक्षेचा संपूर्ण टाईमटेबल.

RCC New

RCC New
 

 बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.  त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 8 ते 10 दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. 

या संकेतस्थळावर मिळेल वेळापत्रक 

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. 

CBSC परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर
 
दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेनं होईल. तर, शेवटचा पेपर माहिती तंत्रज्ञान विषयाचा असेल, या विषयाची परीक्षा 18 मार्चला संपन्न होईल. तर, बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयानं होईल. तर 4 एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.

Tags:

Advertisement

Latest News

धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय
Maharashtra Assembly Election 2024 राज्यातल्या  विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा...
जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार : भाजपच्या यशामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
शरद पवार, उद्धव ठाकरेंची दक्षता; संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटक्याची भीती उचलले मोठे पाऊल