दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा "एकच ध्यास १८ तास अभ्यास"  प्रेरक उपक्रम - डॉ. भीमराव पाटील 

On
दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा

लातूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 'नाचून नाही तर १८ तास वाचून साजरी करणे' हे दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालयाचा आदर्शवत व प्रेरणादायी उपक्रमांचा पॅटर्न महाराष्ट्रभर प्रसिद्ध होऊन अनेक महाविद्यालय त्याचे अनुक्रम करतील. १८ तास सलग अभ्यास करण्याने निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये जास्त वेळ अभ्यास करण्याची क्षमता वाढीस लागेल व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असा आशावाद राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचे  डॉ. भीमराव पाटील यांनी व्यक्त केला. 
daya-2
येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय ग्रंथालय विभाग आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पहाटे ५.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यत  "एकच ध्यास १८ तास अभ्यास" या अभिनव उपक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पवार तर प्रमुख उपस्थिती राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा.देवदत्त सावंत  आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी कांबळे होते. 
डॉ. भीमराव पाटील  पुढे म्हणाले, चांगले विचार पुस्तकात असतात आणि पुस्तक मस्तकात जाण्यासाठी वाचन जरुरी आहे  'विद्यार्थीना पुस्तकांपेक्षा मोबाईल जवळचा वाटायला लागला आहे. त्याच्या आहारी न जाता अशा उपक्रमात सहभागी होऊन सलग अभ्यासाची सवय अंगी बाणावी. आपले व्यक्तिमत्त्व खुलवावे. दयानंद वाणिज्य महाविद्यालय ग्रंथालय विभागाचे उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची त्यांनी आवर्जून  सांगितले. 
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. एस. पवार  म्हणाले, 'विद्यार्थांनी महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण करावे. प्रत्येकजण आपापल्यापरीने बाबासाहेबाना अभिवादन करीत असतो. परंतु १८ तास अभ्यास करून मानवंदना देणे हि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी  सांगितले.  "ग्रंथालयामध्ये ४९००० पुस्तके आहेत. यामध्ये वाणिज्य विद्याशाखेच्या  पुस्तकाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वामी रामानंद तीर्थ अशा विविध महापुरुषाच्या जीवनावर आधारित पुस्तके तसेच कथा कादंबर्यांचे वाचन तरुणाई करत असल्याचे ग्रंथपाल विठ्ठल जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.  
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करण्यात आला. पाहुण्याची ओळख डॉ. बालाजी कांबळे सूत्रसंचालन डॉ . आकांशा भांजी यांनी केले  तर आभार लक्षमिकांत वाघ यांनी मानले कार्यक्रमास डॉ.ब्रिज मोहन दायमा,डॉ .सौ सारिका दायमा,प्रा श्रावण बनसोडे, प्रा.गिल्डा, डॉ. स्मिता भक्कड, प्रा. सौ. अनुजा कांबळे प्रा.सौ. लता जाधव, प्रा. कोनाळे यांसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  ग्रंथालय लिपिक लक्ष्मीकांत वाघ, एल. टी. शेटीया, तानाजी सुतार, सौ. शिवरानी दुबे, नागेश कुरे, कलीम शेख,  सौ. मीरा सोनावणे, शैलेश काळे,  ओम राठोड, श्रीकर अकोसकर यासह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  दिवसभरामध्ये शहरातील प्राध्यापक, पालक व विद्यार्थी यांनी सदिच्छा भेट दिली.
 
Tags:

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत
Maharashtra Assembly Election : 2024 वरळी विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे....
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार : भाजपच्या यशामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
शरद पवार, उद्धव ठाकरेंची दक्षता; संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटक्याची भीती उचलले मोठे पाऊल
छोटे पक्षच किंगमेकर ठरणार - महादेव जानकर
माफी मागा, अन्यथा शंभर कोटींचा दावा ठोकेल; विनोद तावडेंची राहुल गांधी, सुप्रिया सुळेंना नोटीस