RCC  मध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती 

On
RCC  मध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती 

नांदेड : येथील RCC क्लासेस येथे नांदेड शहर वाहतूक शाखेच्या वतीने 14 जुलै रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असे वाहतूक नियम व त्याचे पालन याबाबतीत जनजागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन नांदेड वाहतूक शहर पोलीस शाखेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जसपाल सिंग यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी व RCC प्रा .एस एस राव, श्री तिवारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुक नियम जनजागृती करताना "हेलमेट पोलीस वालों से बचने के लिए नहीं,  घरवालों से दोबारा मिलने के लिए पहनिए" असं उदाहरणासह सांगताना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले त्याबरोबरच लक्षात ठेवा गाडी चालवत असताना तुमचा फोन मला सुध्दा लागू शकतो असे यम राजाचे उदाहरण देऊन गाडी चालवत असताना फोन न वापरण्यासंदर्भातील सूचना केली. 
rcc-2
गाडी चालवत असतानाचा तुमचा विमा काढुन घ्या , गाडी चालवते वेळेस अमली पदार्थाचे सेवन करु नका , सिट बेल्ट चा वापर करा ! दुचाकीवर ट्रिपल सिट बसून प्रवास करू नका ,अति वेगात व धोकेदायक पणे गाडी चालवु नका, मॉडिफाइड हॉर्नचा वापर करू नका तसेच विना लायसन्स वाहन चालू नये त्या बरोबरच गाडी चालवताना विविध प्रकारचे स्टंट करू नका, हेडफोनचा वापर टाळा, मॉडिफाइड सायलेन्सर किंवा आवाज करणारे सायलेन्सर चा वापर करू नका अशा विविध नियमावर सुधारण व सचित्र सादरी करणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबद्दल सुनियोजित मार्गदर्शन करण्यात आले यावेळी RCC क्लासेसच्या शिक्षक वृद्ध व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Tags:

Related Posts

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!